पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील ४० लाख लोकांच्या जीवनात नवी सकाळः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जीवनात जेव्हा अनिश्चितता निघून जाते. तेव्हा एक मोठी चिंता संपुष्टात येते. त्याचा प्रभाव काय असतो, हे मी तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर पाहत आहे. तुमच्या उत्साहाचा मी अनुभव घेत आहे. मला आनंद आहे की, दिल्लीच्या ४० लाख लोकांच्या जीवनात नवीन सकाळ आणण्याची एक उत्तम संधी मला आणि भाजपला मिळाली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते दिल्लीतील रामलीला मैदानावर 'धन्यवाद रॅली'त बोलत होते. यावेळी त्यांनी 'विविधता में एकता, यही भारत की विशेषता', ही घोषणा उपस्थितांकडून वदवून घेतली. 

प्रधानमंत्री उदय योजने अंतर्गत तुम्हाला घराच्या जमिनीचा मालकी हक्क मिळाला आहे, संपूर्ण अधिकार मिळाला आहे. यासाठी तुमचे अभिनंदन. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही दिल्लीतील एक मोठ्या लोकसंख्येला भीती, चिंता, छळ, कपट आणि खोट्या आश्वासनांना सामोरे जावे लागले. बेकायदा, अवैध, जेजे क्लस्टर, सिलिंग, बुलडोझर सारख्या शब्दांभोवतीच एकी मोठी लोकसंख्या जगत होती. निवडणुका आल्यानंतर तारखा वाढवल्या जात होत्या. बुलडोझरचे चाक जखडवले जात होते. पण समस्या तिथेच होती. या समस्येच्या कायमस्वरुपी तोडग्यासाठी हे काम मी आपल्या हातात घेतले. 

या कॉलनी नियमित करण्याचे काम मी आपल्या हाती घेतले आणि या वर्षीच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रक्रिया पूर्ण केली. आता संसदेतील सत्रात विधेयक संमतही करण्यात आले आहे. 

इतक्या कमी वेळात तंत्रज्ञानाच्या मदतीने दिल्लीतील १७०० हून अधिक कॉलनींची सीमा चिन्हित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. १२०० हून अधिक कॉलनींचे नकाशे पोर्टलवर टाकण्यात आले आहेत. हा निर्णय घराशी निगडीत तर आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या व्यवसायाला गती देणाराही आहे. समस्या प्रलंबित ठेवण्याचे राजकारण आम्ही करत नाहीत. 

या लोकांनी दिल्लीतील सर्वांत आलीशान आणि महागड्या परिसरात २ हजारहून अधिक बंगले व्यावसायिकांना देण्यात आले होते. या बंगल्या बदल्यात काय झाले, कसे झाले यात मी पडू इच्छित नाही. त्या लोकांना त्या बंगल्यात राहण्यास पूर्णपणे सूट देण्यात आली होती. परंतु, तुमच्या कॉलनी नियमित करण्यासाठी काहीच करण्यात आले नाही. सातत्याने अडथळे आणले. त्यांना माहीत नव्हते की हा मोदी आहे.