पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोरोनाविरोधात लढताना अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

देशातील कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील मुख्यमत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना विरोधातील संकटाचा सामना करताना अर्थव्यवस्थेकडेही प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मोदी म्हणाले की, 'लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यामुळे मागील दिड महिन्यात देशातील हजारो जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरलोय. पुढील काही महिने कोरोना विषाणूचे संकट कायम राहण्याचे संकेत दिसत असून मास्क हा जीवनाचा एक अविभाज्य घटक असेल, असेही मोदींनी म्हटले आहे.  

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

२५ मार्च ते ३ मेपर्यंत देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्याने हटवण्यासंदर्भात मोदींनी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.  यावेळी मेघालयाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी राज्यातील लॉकडाऊन ३ मेनंतरही कायम ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. या बैठकीनंतर त्यांनी ट्विटवरुन देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.  

मुंबईत लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला, चौघांना अटक

या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री  डॉ. हर्षवर्धन यांच्याशिवाय पंतप्रधान कार्यालय आणि अन्य मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यासह अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपपल्या राज्यातील परिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यापूर्वी २५ मार्चपासून ते  १४ एप्रिलच्या कालावधीत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनचा कालावधी हा १९ दिवसांनी वाढवला होता. मेघालयप्रमाणे देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा असलेल्या महाराष्ट्रातील पुणे-मुंबई सारख्या भागात लॉकडाऊनचा कालावधी वाढवा लागू शकतो, असे राजेश टोपे यांनी म्हटले होते.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi to Chief Ministers need to strengthen economic activities combat Covid19 coronavirus