पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरच्या मुद्यावर मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

मोदी आणि ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी दहशतवादाच्या मुद्यावर दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापतीचा पार्श्वभूमीवर मोदींनी यावेळी पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

एएनआयच्या वृत्तानुसार, या दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरुन द्विपक्षीय चर्चा केली. सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना रोखणे गरजेचे आहे, असे मोदींनी यावेळी म्हटले आहे. पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे शांततेला धोका निर्माण झाला आहे. भारत त्यांच्याकडून होणाऱ्या कुरापती सहन करणार नाही, असेही मोदींनी स्पष्ट केले. याशिवाय भारत-अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबत लवकरच पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी ट्रम्प यांना दिले आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार बाजवा यांना ३ वर्षे मुदतवाढ

केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर भारत-पाक यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत.  काश्मीरच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय चर्चा करून सोडवावा, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी  मांडली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून काश्मीर प्रश्नावर चर्चा केली होती. त्यानंतर मोदींनी काश्मीरच्या मुद्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.   

J&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली शहांची भेट