पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममतादीदींना प.बंगालमधील नागरिक 'दुश्मन' का वाटतात?

ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी

दिल्लीतील रामलीला मैदानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ममता दिदी कोलकाताहून थेट संयुक्त राष्ट्र संघात पोहचल्या. ममतादीदी सत्ता येत आणि जाते मग तुम्हाला भीती कसली वाटते? असा प्रश्नार्थक टोला मोदींनी त्यांना लगावला. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमधून येणाऱ्या शरणार्थ्यांच्या मदत करायला हवी, अशी भूमिका घेतली होती. मात्र आता त्या सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

CAA : शहरी नक्षली अन् काँग्रेस देशात अफवा पसरवत आहेत : PM मोदी

बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवा. इथल्या जनतेवर तुमचा विश्वास नाही का? तुम्हाला येथील जनता शत्रू का वाटते? बंगालच्या जनतेचा तुमच्यावरील विश्वास का उडाला? अशा प्रश्नांचा भडिमार करत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दिक तोफ डागली. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात अफवा पसरवणे बंद करा. तुम्ही कोणाचे समर्थन करत आहात आणि कोणाला पाठिशी घालत आहात ते देशवासियांना समजते, असा टोलाही मोदींनी ममता बॅनर्जी यांना लगावला. 

पंतप्रधान म्हणाले, मोदीचा पुतळा जाळा पण देशाची संपत्ती नको

सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासह काँग्रेसच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचेही यावेळी दाखले दिले. देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी सभागृहात विशिष्ट आस्थेमुळे बांगलादेशमध्ये अत्याचार झेलणाऱ्यांना भारतामध्ये आश्रय द्यायला हवा, अशी भूमिका घेतल्याची आठवण मोदींनी करुन दिली.

मुस्लिमांनी घाबरु नये, भाजपच त्यांचा विकास करेलः नितीन गडकरी

याशिवाय आसामचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील शरणार्थ्यांच्या बाजूने भूमिका मांडली होती. कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते प्रकाश करात यांनीही बांगलादेशमधून येणाऱ्या शरणार्थ्यांना मदत करायला हवी असे म्हटले होते, असे सांगत मोदी सरकारच्या निर्णयानंतर या नेत्यांनी मताच्या राजकारणासाठी आपली भूमिका रातोरात बदलली, असा आरोप मोदींनी केला आहे.