पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींची प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग, सोनियांसह बड्या नेत्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग

कोरोना विषाणूविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीपूर्वीच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा करत आहेत. पंतप्रधान मोदींनी रविवारी दोन माजी राष्ट्रपती आणि दोन माजी पंतप्रधान यांच्याशिवाय विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांशी कोरोना विषाणूच्या संकटावर चर्चा केली. 

धारावीत आतापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण, अडीच हजार लोक होम क्वारंटाइन

पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूविरोधात सुरु असलेल्या लढाईदरम्यान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. 

पुण्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, राज्यात बाधितांचा आकडा ६९० वर

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, बीजेडीचे नवीन पटनाईक, अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांच्याशिवाय दक्षिण भारताील मोठे नेते के चंद्रशेखर राव, एमके स्टॅलिन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. 

एअर इंडियाच्या कार्याला पाकिस्तानने केला सलाम

८ एप्रिलला सर्वपक्षीय बैठक

कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी रणनीति आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी संसदेतील विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलतील. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधान हे ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सभागृहातील विविध पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील ५ किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असतील.