पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकाबाबत केलेल्या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. अल्पसंख्यांक भयग्रस्त आहेत हे मोदींना मान्य असेल तर त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, ज्या लोकांनी अखलाकची हत्या केली. ते लोक त्यांच्या प्रचारसभेत त्यांच्यासमोर पहिल्या रांगेत बसले होते. मोदींचे हे वक्तव्य ढोंगीपणाचे आहे, असा आरोप त्यांनी केला.
बुरखा बंदीवर ओवेसी म्हणाले, शिवसेनेकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवाल
A Owaisi: If Muslims seriously live in fear can the PM tell us, out of the 300 odd MPs, how many Muslim MPs he has in own party who got elected from Lok Sabha? This is the hypocrisy & contradiction which the PM & his party is practicing from last 5 years. https://t.co/yMHLrFIXV4
— ANI (@ANI) May 26, 2019
त्यांनी मोदींना प्रश्न केला की, मुस्लिम समाजात जर भीतीचे वातावरण आहे, असे मोदींना वाटत असेल तर ते त्या टोळीला रोखतील का जे गायीच्या नावावर हत्या करत आहेत. मुसलमानांना मारहाण करत आहेत. त्यांचे व्हिडिओ बनवून बदनाम करत आहेत? जर मुस्लिम खरेच भितीच्या वातावरणात जगत असतील तर मोदींनी आम्हाला सांगावे की ३०० खासदारांपैकी त्यांच्या पक्षाचे किती मुस्लिम आहेत जे लोकसभेत निवडून आले.
बुरख्यावर बंदी घाला आणि घूंघटवरही बंदी आणा, जावेद अख्तर यांचे मत
हे सर्व ढोंग आणि विरोधाभास आहे असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, भाजप आणि एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये सर्व नूतन खासदारांसमोर बोलताना अल्पसंख्यांकाबाबत भाष्य केले होते. देशात आतापर्यंत अल्पसंख्याकांना आतापर्यंत छळले असून यापुढे असे कधी होणार नाही, असे ते म्हणाले होते.