पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोठी धाव घेण्यासाठी 'न्यू इंडिया' सज्जः पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याचे उद्धिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात यावरच भर देण्यात आला आहे. मोठी धाव घेण्यासाठी 'न्यू इंडिया' सज्ज झाला आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येत्या ५ वर्षांत देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यात शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे. शेतकऱ्यांना आम्ही आता निर्यातदार करणार आहोत. अर्थसंकल्पात यावर भर देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर दुसऱ्यांदा वाराणसीत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) भाजपच्या सदस्यता नोंदणीची सुरुवात केली. यावेळी ते बोलत होते. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना अर्थसंकल्प समजवून सांगितला. तसेच अर्थसंकल्पावर नापसंती दर्शवणाऱ्यांवर त्यांनी टीकाही केली.

काहींची भारतीयांच्या सामर्थ्यांवर शंका आहे. पण विकासाच्या यज्ञातूनच परिश्रमाचा गंध येतो. शेतकऱ्यांना आम्ही आता निर्यातदार करणार आहोत. अर्थसंकल्पात यावरच भर दिला आहे. 

आम्ही कधी शौचालय, घर तर कधी स्वच्छतेवर जोर दिला. आता प्रत्येक घराला पाणी हा आम्ही संकल्प केला आहे. यासाठी जलशक्ती अभियान सुरु केला आहे. यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु केले आहे. जल ग्रीड सुर करण्याचे ध्येय ठेवले आहे.