पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरीच थांबा! पोस्टर दाखवत मोदींनी दिला हा संदेश

मोदींनी पोस्टरच्या माध्यमातून दिला घराबाहेर न फिरण्याचा संदेश

भारताला आणि प्रत्येक भारतवासीयांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या अभ्यासाचा दाखला देत कोरोना विषाणूच्या प्रवासाचे सर्कल हे भयावह असल्याची माहिती दिली. प्रगतशील आणि सर्व सुविधा असूनही अमेरिका आणि इटलीला कोरोनाने हतबल केल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोदींचे निवेदन ऐकल्यावर मी ही चरकलो - उद्धव ठाकरे

जर आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल तर कोरोना विषाणूचे सर्कल तोडावे लागेल. यासाठी आपल्याला सक्तीने घरी बसवण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मोदींनी आपल्या भाषणादरम्यान एक पोस्टर दाखवत कोरोनाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला. 

को- कोई  
रो- रोड पर
ना- ना निकले!  
असा संदेश देणारे पोस्टर दाखवून पुढील २१ दिवस सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ला आणि कुटुंबियांना आणि देशाला भयावह विषाणूच्या विळख्यातून वाचवायचे आहे, असे मोदींनी सांगितले. कोराना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी सलग दुसऱ्या आठवड्यात देशवासियांशी संवाद साधला. मागील आठवड्यात मोदींनी रविवारी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्यांनतर मोदींनी सक्तीने घरात बंधक करणार असल्याची घोषणा केली. हा निर्णय तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी आणि देशासाठी महत्त्वाचा आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले आहे. 

मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन, नरेंद्र मोदींची घोषणा

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखायचे असेल तर आपल्याला त्याची सर्कल चेन तोडावी लागेल. यासाठी पुढील तीन आठवडे तुम्हाला घरातच रहावे लागेल. कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी घराबाहेर लक्ष्मण रेखा आखून २१ दिवस बाहेर पडू नका, असा संदेश मोदींनी देशवासियांना दिलाय. याकाळात गरजेच्या वस्तुंचा पुरवठा सुरळीत होईल, याची खबरदारी घेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिलासादायक! कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनामुक्त ८ रुग्णांना डिस्चार्ज

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi Showing Poster And Given Massage lockdown Country for 21 days Due to coronavirus