पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधात भारत-चीन मिळून लढावे लागेल : मोदी

नरेंद्र मोदी

भारत-चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करुन जागतिक संकटाचा सामना करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाच्या ७० व्या वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांना पत्राच्या माध्यमातून संदेश दिला. कोरोना व्हायरसचा सामना एकत्रितपणे करु असा उल्लेखही मोदींनी पत्रातून केलाय. दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्राच्या माध्यमातून दोन्ही देशातील सलोखा कायम राहिल, असा विश्वास व्यक्त केला. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ वर; मुंबईत १४ नवे रुग्ण

मोदींनी पत्रात म्हटलंय की, कोविड-१९ मुळे निर्माण झालेले संकट हे जग एकेमेकांसोबत जोडले गेल्याचे एक उदाहरण आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जागतिक एकीने लढण्याची गरज आहे. भारत आणि चीन प्राचीन संस्कृतीचा वारसा असणारी दोन राष्ट्रे आहेत. दोन्ही राष्ट्रांमध्ये खूप दिवसांपासून आदान-प्रदान होत आहे. दोन्ही विकसनशील राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असून जागतिक स्तरावर दोन्ही राष्ट्रांनी एक  स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रामध्ये केलाय.   

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी तो नॅशनल ट्रेंड नाही, कारण...

भारत-चीन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हे केवळ दोन्ही राष्ट्रांसाठीच उपयुक्त नाहीत. तर आपल्या सभोवतालच्या परिक्षेत्रासह जागतिक शांती, स्थिरता आणि समृद्धीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही रष्ट्रांतील संबंध आणखी दृढ करण्यासाठी सकारात्मक असल्याचा ग्वाही त्यांनी चीनी पंतप्रधानांना दिली. कोरोनामुळे जगात दहशतीचे वातावरण आहे. चीनमधून जगभरात संक्रमण झालेल्या कोरोना विषाणूमुळे भारतासह युरोपात थैमान घातले आहे. भारत-चीन नव्हे तर सर्वांनी मिळून या संकटावर मात करायची आहे, असा संदेश मोदींनी दिला आहे.