पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुस्लिम महिलांना त्यांचा अधिकार मिळवून दिल्याचा अभिमान'

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभेनंतर राजसभेमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक मंजूर करण्यात मोदी सरकारला मोठे यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मुस्लिम महिलांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. विधेयक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा दिलेल्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि पक्षांचे त्यांनी आभार मानले आहेत.

ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

'संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. आज कोट्यवधी मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिहेरी तलाक या कुप्रथेने त्रस्त असलेल्या मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणी मी सर्व खासदारांचे आभार मानतो.', असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

काँग्रेसने मुस्लिम महिलांना न्याय दिला नाही, रविशंकर प्रसाद यांचा टोला

 'तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर होणे म्हणजे महिला सशक्तिकरणाच्या दिशेने मोठे पाऊल आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली देशातील कोट्यवधी माता-भगिनींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचे पाप केले गेले होते. मुस्लिम महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याची संधी आमच्या सरकारला प्राप्त झाली, याचा मला अभिमान वाटतो.'  असं लिहित तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi says thank all parties and mps who have supported the passage triple talaq bill