पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याची वेळ आली: नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या कॉप -१४ (कॉन्फर्न्स आफ पार्टीज) ला संबोधित केले. यावेळी हवामान बदल, जैवविविधता आणि वाढते वाळवंट या गंभीर मुद्द्यावर मोदी बोलत होते. प्रदूषण वाढवणारे आणि जमिनीला हानी पोहचवणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्याची वेळ आली असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. तसंच येत्या १० वर्षात ५० लाख हेक्टर जमिनीला सुपीक बनवणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

वाळवंटाची समस्या गंभीर - 
या संमेलनातील भाषणा दरम्यान मोदींनी सांगितले की, भारतात धरतीला पवित्र स्थान दिले आहे. भारतीय संस्कृती धरतीला माता मानते. भारतीय नागरिक रोज सकाळी उठल्यानंतर धरतीमातेच्या पाया पडतो. जगामध्ये सध्या हवामान बदलाचे तीव्र परिणाम होताना दिसून येत आहे. यामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जमिनीचे तापमान वाढत आहे, समुद्रच्या पाणी पातळीत वाढ होते, पूर, भूस्खलन, वादळ यांसारख्या घटना वाढत आहेत. जगातील दोन तृतीअंश देश वाळवंटीरण सारख्या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचे मोदींनी सांगितले.

प्लॅस्टिकमुळे होतेय जमिनीचे मोठे नुकसान - 
प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत मोदींनी सांगितले की, जगभरातमध्ये प्लॅस्टिकची समस्या मोठी आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे वाळंवटात वाढ होत आहे. प्लॅस्टिकचा कचरा फक्त आरोग्याला हानीकारक नाही तर ते जमिनीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान करत आहे. आमच्या सरकारने घोषणा केली आहे की, येणाऱ्या काही वर्षात एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर बंद करणार आहे. आम्ही प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर काम करत आहोत. येणाऱ्या काही दिवसात आम्ही एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकला अलविदा करणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली.

संपूर्ण जग जलसंकटाचा सामना करत आहे -
जलसंकटाबाबत बोलताना मोदींनी सांगितले की, आज जग गंभीर जलसंकटाचा सामान करत आहे. जेव्हा आपण वाळवंटाविषयी विचार करत आहोत. तर जलसंकट सारख्या गंभीर समस्येवर देखील विचार करणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये जमीन, जल, वायू आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या संकल्पना दिल्या आहेत. २०१५ ते २०१७ या कालावधीत भारतामध्ये वनिकरणामध्ये ०.८ दक्षलक्ष हेक्टरने वाढ झाली आहे. 

संमेलनात १९६ देशांचे प्रतिनिधी सहभागी -
कॉप-१४ हे संमेलन उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडाच्या इंडिया मार्ट अॅण्ड एक्सपोमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. २ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या कॉप-१४ चे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. जगाला वाढत्या वाळवंटातून वाचवण्यासाठी कॉप-१४ चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील जवळपास १९६ देशांचे प्रतिनिधींनी या संमेलनात सहभागी झाले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi says my government has announced that India will put an end to single use plastic