पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशातला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला असल्याचे मोदींनी सांगितले. ३ मे पर्यंत सर्वांना लॉकडाऊनमध्ये रहावे लागणार आहे. या काळात सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करा, जिथे आहात तिथेच रहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. मोदींनी याआधी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी आज पुन्हा देशाला संबोधित करत लॉकडॉनचा अवधी वाढवला. 

'कोरोनाविरोधात सर्वजण एकत्र, यापेक्षा मोठी देशभक्ती नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, कोरोनाची लढाई भारत नेटाने लढत आहे. तुमच्या धिरामुळे आणि त्यागामुळे आतापर्यंत कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात. इतर देशांशी तुलना करण्याची ही वेळ नाही. मात्र आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात असल्याचे मोदींनी सांगितले. 

भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नसते तर काय झाले असते याची कल्पना करताना अंगावर काटे उभे राहतात. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा देशाला चांगला फायदा झाला. लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. पण जनतेच्या जीवापेक्षा मोठं मनाता येणार नाही, असे मोदींनी सांगतिले. लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे. देशातील राज्य सरकारने देखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. काही राज्यात आधीच लॉकडाऊन वाढवला असल्याचे मोदींनी सांगितले. 

माझी सर्व देशवासीयांना विनंती आहे की कोरोनाला नव्या क्षेत्रात वाढू द्यायचं नाही. स्थानिक पातळीवर जर एकही रुग्ण वाढत असेल किंवा मृत्यू होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे, असे मोदींनी सांगितले. कोरोनाच्या हॉटस्पॉटवर कडक नजर आहे. नवे हॉटस्पॉट बनू देऊ नका यातून संकट वाढेल, असे मोदींनी सांगितले. पुढच्या एका आठवड्यात कडक निमय होतील. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक ठिकाणी कडक नजर असेल. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होतंय की नाही याचे मुल्यांकन केले जाईल. २० एप्रिलपर्यंत ज्या राज्यात नियंत्रण आणले जाईल, तेथील नियम शिथील केले जातील, असे मोदींनी सांगितले.