पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मोदींनी दिले असे उत्तर

राहुल गांधी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या टीकेवर मोदींनी प्रत्युत्तर दिले. 'सहा महिन्यांनंतर माझ्या पाठीवर फटके मारण्याचे विरोधक सांगताहेत. त्यासाठीच मी सध्या जास्त सूर्यनमस्कार घालतो आहे. जेणे करून माझी पाठ आणखी मजबूत होईल.', असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला आहे. तसंच, 'विरोधकांची टीका मला प्रेरणादायी वाटते. विरोधकांनी केलेल्या टीकेचे मी स्वागत करतो.', असे मोदींनी सांगितले. 

व्हिडिओ पाहण्याच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या जाहिराती

बुधवारी एका सभे दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी असे म्हटले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी  भाषण देत आहेत. पण ६ महिन्यांनंतर ते घरातून बाहेर पडू शकणार नाहीत. कारण भारतातील तरुण त्यांच्या पाठीवर फटके मारतील आणि त्यांना समजावतील की भारतातील तरुणांना रोजगार दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.'

वायुगळतीमुळे उ.प्रदेशमध्ये ७ जणांचा मृत्यू

दरम्यान, यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'सहा महिन्यांनंतर माझ्या पाठीवर फटके मारण्याचे वक्तव्य केले जात आहे. हे काम थोडे अवघड आहे. याची तयारी करण्यासाठी सहा महिने लागतीलच. मी सुध्दा ठरवले आहे की सहा महिन्यात सूर्य नमस्काराची संख्या वाढवणार. तसंच मी सहा महिने ऐवढी मेहनत करेन की जेणेकरून माझ्या पाठीला प्रत्येक फटके सहन करण्याची ताकद मिळेल.' असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला आहे. 

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे