पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EXCLUSIVE: यूपीए काळात सर्जिकल स्ट्राइक नाही- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Mohd Zakir/HT PHOTO)

यूपीए काळातही सर्जिकल स्ट्राइक केल्याचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळला आहे. ‘हिन्दूस्थान टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोदी यांनी यूपीए काळात कोणतेही सर्जिकल स्टाइक करण्यात आले् नव्हते असे म्हटले आहे.

२०१४ पूर्वीही अनेक सर्जिकल स्ट्राईक, पण जाहिरात नाही केली - मनमोहन सिंग

त्यावेळच्या लष्करप्रमुखांनाही अशा पध्दतीच्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती नसल्याचे म्हटले आहे. कोणत्या पध्दतीची ही सर्जिकल स्ट्राइक होती ? कोणी याचे आदेश दिले होते ?, याचे यूपीएने उत्तर दिले पाहिजे, असा जाब विचारत यूपीए काळातील सर्जिकल स्ट्राइक संबंधी कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, इतकेच मी सांगू शकतो, असे ते म्हणाले. 

शेतकरी, युवक आणि व्यापाऱ्यांसाठी मोदी सरकार विनाशकारी- मनमोहन सिंग

गेल्या एक दशकापासून भारत सरकारने पाक प्रायोजित दहशतवादावर काहीच केले नाही. पाकिस्तान सातत्याने हल्ला करत होता. असे हल्ले करणाऱ्यांबाबत काहीच केले जात नव्हते. दहशतवादी आणि त्यांच्या प्रायोजकांना काहीही करण्याची एक प्रकारची सूट देण्यात आली होती. उरी हल्ल्यानंतर २०१६ मध्ये आणि पुलवामा हल्ल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइक करुन आम्ही त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल असा संदेश दिला.

सर्जिकल स्ट्राईकवरून काँग्रेसचे मी टू-मी टू, मोदींची टीका

अशा कारवाईमुळे तणाव वाढू शकतो, ही शंका मोदींनी फेटाळून लावला. ते म्हणाले, आता भारताविरोधात दहशतवादी कारवाई करण्याआधी ते विचार करतील. कारण त्यांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. भविष्यात हल्ले झाल्यास सरकारवर कारवाई करण्याचा दबाव वाढू शकतो, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी दबावाच्या भीतीपोटी काहीच करायचे नाही का, असा उलट सवाल केला. 

सर्जिकल स्ट्राईक साड्यांना मोठा प्रतिसाद, मोदींच्या प्रतिमेचा वापर