पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर मोदींनी व्यक्त केला आनंद, म्हणाले...

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीच्या अखेरिस भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'दोन्ही देशातील या मैत्रीचा फक्त आपल्या नागरिकांनाच नाही तर संपूर्ण जगाला फायदा होईल.', अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीनं शेतकऱ्याची आत्महत्या

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आपल्या खास पाहुण्यांचे अविस्मरणीय स्वागत करेल. ही भेट खूप खास आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्या मैत्रीला दीर्घकालिन बळ मिळेल.'

मनसेच्या मोर्चाचा इम्पॅक्ट; विरारमध्ये २३ बांगलादेशींना अटक

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सुध्दा भारत दौऱ्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, 'भारत दौऱ्याबद्दल आपण उत्सुक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. ते खूप चांगले नेते आहेत. गेल्या आठवड्यच्या अखेरिस मी फोनवरून नरेंद्र मोदींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाखो लोक माझ्या स्वागतासाठी येणार असल्याचे सांगितले.' दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्या दरम्यान अहमदाबादला देखील जाणार आहेत. 

चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत घेतला १,११० नागरिकांचा बळी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi says delightd that donald trump will be india will accord him memorable welcome