पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतासाठी ऐतिहासिक दिवस; PM मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाले आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या विधेयकामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आजचा दिवस हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लोकांवर अन्याय झाला आहे. त्याचे दु:ख दूर करणारे हे विधेयक आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने आनंद झाला असल्याचे सांगत मोदींनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. 

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने

नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत १२५-१०५ अशा फरकाने मंजूर झाले. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आले होते. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने १२५ मते तर विरोधात १०५ मते पडली. तर लोकसभेमध्ये या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी मतदान केले तर विरोधामध्ये ८० खासदारांनी मतदान केले. तिहेरी तलाक, कलम ३७० या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर तिसरा संकल्प राज्यसभेत पारित करुन घेण्यात मोदी सरकारला यश आले. 

राहुल-रोहित-विराट या त्रिदेवांसमोर विंडीज संघ हतबल