पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA वर मोदी म्हणाले, जे महात्मा गांधींनी म्हटलं होतं, तेच मी करत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बेवूर मठातील कार्यक्रमात त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य केले. जे महात्मा गांधींनी म्हटले होते, तेच आपण करत असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारण करणारे काही लोक हे समजू इच्छित नाहीत, असे त्यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानात अल्पसंख्यकांवर होत असलेल्या अत्याचारावरुन त्यांनी तेथील सरकारवरही निशाणा साधला. 

मोदी पुढे म्हणाले की, नागरिकत्व कायदा हा नागरिकत्व घेणे नाही तर नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. सुधारित नागरिकत्व कायदा ही त्या कायद्यातील केवळ एक दुरुस्ती आहे. इतकी स्पष्टता असतानाही, काही लोक सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भ्रम पसरवत आहेत. मला आनंद आहे की, आजचा युवक अशा लोकांचा भ्रम दूर करत आहेत. 

पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार होत आहे. त्यावरुनही जगभरात आपले युवक आवाज उठवत आहेत. युवा जोश, युवा ऊर्जाच २१ व्या शतकातील या दशकात भारताला बदलण्याची ताकद आहे. नवीन भारताचा संकल्प, तुमच्याकडूनच पूर्ण होणार आहे. 

स्वामी विवेकानंद म्हणत असत की, जर मला १०० ऊर्जावान युवकांची साथ मिळाली तर मी भारताला बदलून टाकेन, म्हणजेच परिवर्तनासाठी आपली ऊर्जा, काही करण्यासाठी उत्साहाची आवश्यकता आहे. 

मागीलवेळी जेव्हा मी येथे आलो होतो, त्यावेळी गुरुजी, स्वामी आत्मआस्थानंद यांचे आशीर्वचन घेऊन गेलो होतो. आज ते शारीरिक रुपाने आपल्या दरम्यान उपस्थित नाहीत. पण त्यांचे काम, त्यांनी दाखवलेले मार्ग, रामकृष्ण मिशनच्या रुपाने सदैव आपला मार्ग प्रशस्थ करत राहतील.