पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मीम्सचा आनंद घ्या, मोदींचं 'कूल' उत्तर

मोदींचं 'कूल' उत्तर

सोशल मीडियावर एखाद्या प्रसंगावरून मीम्स तयार करून ते व्हायरल करणाऱ्या 'सर्जनशीलां'ची काही कमी नाही. अनेक बडे लोक या मीम्समधील 'सर्जनशील'तेला बळी पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हा प्रकार काही नवा नाही. मात्र त्यांनी या प्रकाराला दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

रेल्वे मंत्री म्हणतात, १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय

सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या मोदींचा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या फोटोवर नक्कीच मीम्स तयार करणार, असं ट्विट एका युजर्सनं केलं. विशेष म्हणजे अनपेक्षितपणे मोदींनी त्या युजर्सला उत्तरही दिलं आहे. 'तुमचं स्वागत आहे, याचा आनंद लुटा', असं मोदींनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर या हजरजबाबीपणाची सध्या चर्चा सुरू आहे. 

आज राज्यात या वर्षांतले शेवटचे सूर्यग्रहण दिसले. मोदी देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते. मात्र दिल्लीमध्ये ढग असल्यामुळे सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता न आल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'