पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : किनाऱ्यावरील कचरा गोळा करून मोदींनी दिला स्वच्छता संदेश

मोदींचा स्वच्छता संदेश

तमिळनाडूतील महाबलीपूरम येथील समुद्र किनारी मोदींनी पहाटे फेरफटका मारला. यादरम्यान किनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा उचलून मोदींनी पुन्हा एकादा स्वच्छतेचा संदेश दिला आहे. प्लास्टिक मुक्त  आणि स्वच्छ भारताचा नारा या पूर्वीही मोदींनी दिला होता.

..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास

 आपला देश प्लास्टिक मुक्त करण्याचं आणि देश स्वच्छ करण्यास सहकार्य करण्याचं आवाहन  मोदींनी व्हिडीओतून देशवासीयांना दिलं आहे. 
 महाबलिपूरमच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी जवळपास ३० मिनिटे फेरफटका मारला. यावेळी किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा त्यांनी स्वच्छ केला. हा कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या त्यांनी एका पिशवीत भरून हॉटेलच्या साहाय्यकाकडे विल्हेवाट लावण्यासाठी दिला. 

'अश्रू खरे असतील तर बाळासाहेबांच्या अटकेबद्दल माफी मागा'

सावर्जनिक स्थळं ही स्वच्छ ठेवण्यात आपण हातभार लावला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची  काळजीही आपण घेतली पाहिजे असं ते म्हणाले.