पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिली खास भेटवस्तू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे महाबलीपूरममध्ये  स्वागत केले. दोन दिवसांच्या भारत भेटीवर आलेले जिनपिंग आणि मोदी यांच्यात याच ठिकाणी अनौपचारिक स्वरुपाची चर्चा झाली. यासाठी या संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी शी जिनपिंग यांचा पर्यटक गाईड म्हणून भूमिका पार पाडली.    

मुंबईत चौथी भाषा आणाल तर याद राखा! पुन्हा मराठीचा मुद्दा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास तमिळ पेहराव केला होता. राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या राष्ट्रपतींना महाबलीपूरममधील ऐतिहासिक स्थळं दाखवली. त्यांची इंत्यभूत माहिती सांगितली. या स्थळी फिरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी नारळ पाण्याचा आस्वाद सुद्धा घेतला. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे भारत-चीन संबंध यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असे मानले जात आहे.

राहुल गांधी मुंबईतील सभेत भाजप-सेनेच्या कारभाराचा पंचनामा

जिनपिंग यांच्यासोबत १०० जणांचे शिष्टमंडळही आले आहे. यामध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचाही समावेश आहे. भारताकडून या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे ही अनौपचारिक स्वरुपाची चर्चा असणार आहे. त्यामुळे कोणताही करार या बैठकीअंती होणार नाही. 

अपडेट्स 

मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिली खास भेटवस्तू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला.