पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'स्वच्छ भारत अभियान'साठी मोदींना ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार प्रदान

'स्वच्छ भारत अभियान'साठी मोदींना ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार प्रदान (ANI / Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात स्वच्छता अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ग्लोबल गोलकिपर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना सन्मानित केले. ज्या भारतीयांनी या अभियानाचे जन आंदोलनात रुपांतर केले, ज्यांनी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन आयुष्यात सर्वोच्च प्राथमिकता दिली त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे मोदींनी म्हटले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या कोणत्याही देशातून अशा अभियानाबाबत ऐकायला किंवा पाहायला मिळालेले नाही. या अभियानाचा सर्वाधिक फायदा हा देशातील गरीब, देशातील महिलांना झाला आहे. भारतातील स्वच्छते बाबतचे आपले अनुभव आणि आपले वैशिष्ट्य जगातील इतर देशांबरोबर सामायिक करण्यास तयार आहे. 

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

हजारो वर्षांपासून आम्हाला उदार चरितानाम तु वसुधैव कुटुम्बकमचे धडे देण्यात आले आहेत. याचा अर्थ मोठ्या विचारांसाठी, मोठे मन असणाऱ्यांसाठी संपूर्ण पृथ्वी एक परिवार आहे. 

भारत स्वच्छतेसाठीचे आपले लक्ष्य प्राप्त करण्याच्या जवळ आहे. पण भारत दुसऱ्या अभियानांवरही मोठ्या वेगाने काम करत आहे. फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून तंदुरस्त आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी अभियान सुरु आहे, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी प्रत्येक भारतीय हिंदूच - मोहन भागवत

त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत आमचे लक्ष हे जल संरक्षण आणि पुनर्वापरावर आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत राहिल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi receives bill and Melind a gates Foundation Award for swachh Bharat campain