पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ही तर फक्त सुरुवात, मसूद प्रकरणावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जैश ए मोहम्मद आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा म्होरक्या अजहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी बऱ्याच काळापासून भारत प्रयत्नशील आहे. मसूदच्या मुसक्या आवळणे हे आपल्यासाठी मोठे यश असून ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.  

मोदी जयपूरच्या सभेमध्ये बोलत होते. ते म्हणाल की, बऱ्याच काळापासून भारत दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने घेतलेला निर्णय हा समाधानकारक असून वेळाने का होईना पण गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत. १३० कोटी जनतेचा आवाज आज जगभरात पोहचला आहे. आता कोणीही भारताचा आवाज दाबू शकत नाही. ही फक्त सुरुवात आहे, पुढे बघा काय होते, अशा शब्दात त्यांनी मसूदसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. 

अजहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देश सुरक्षित हातामध्ये आहे, अशा शब्दात त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.