पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प यांची पत्नी, मुलगी-जावयाचे कौतुक करताना मोदी म्हणाले...

मेलानिया ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, इवांका ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटेरा स्टेडिअमवर आयोजित नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे कौतुक केले. ट्रम्प यांचा दौरा हा भारत आणि अमेरिकेतील संबंधातील एक नवा अध्याय असल्याचे ते म्हणाले. आपल्या भाषणाच्या अखेरीस मोदी यांनी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड यांची तोंडभरुन स्तुती केली. 

'नमस्ते ट्रम्प': भारत-अमेरिकेच्या नात्याचे नवे युग सुरु- PM मोदी

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांची स्तुती करताना मोदी म्हणाले की, आरोग्य आणि संपन्न अमेरिकासाठी तुम्ही जे केले. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. समाजात मुलांसाठी जे तुम्ही करत आहात. ते खूपच प्रशंसनीय आहे. 

फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, तुमचे इथे उपस्थित असणे ही सन्मानाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणता, बी बेस्ट, तुम्हाला लक्षात आले असेल की आजच्या स्वागत समारंभारत लोकांकडून हीच भावना प्रकट होत आहे. 

'चायवाला'...खूप कडक आहे, ट्रम्प यांची 'मन की बात'

ट्रम्प यांची मुलगी इवांकाबाबत मोदी म्हणाले की, इवांका या दोन वर्षांपूर्वी भारतात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी पुन्हा भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तुम्ही भारतात आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. 

यावेळी मोदी यांनी इवांकाचे पती जेरेड कुश्नर यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, जेरेड तुमची विशेषतः ही आहे की, तुम्ही लाइमलाइटपासून खूप दूर राहता, आणि जे काम करता त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात. तुम्ही जेव्हा ही भेटात तेव्हा आपल्या भारतीय सहकाऱ्यांचे कौतुक करत असता. तुम्हाला भेटून आणि इथे पाहून मला खूप आनंद होत आहे.

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi praises melania trump ivanka trump jared kushner in namaste trump in donald trump india tour