पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्पष्ट विचार असलेला विद्वान नेता, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

स्पष्ट विचार असलेला विद्वान नेता, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

अरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी दिवंगत अरुण जेटली यांच्या पत्नी आणि मुलाशी फोनवर संवाद साधत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनीही आपला हैदराबाद दौरा आटोपता घेतला. माजी अर्थ मंत्र्यांच्या निधनावर भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही टि्वट करत श्रद्धांजली व्यक्त केली आहे. 

पंतप्रधान मोदींचे 'संकटमोचक' सहकारी अरुण जेटली

पंतप्रधान मोदींनी जेटलींच्या पत्नी आणि मुलगा रोहन याच्यांशी फोनवर बोलून सांत्वन केले. यावेळी जेटली यांच्या कुटुंबीयांनी पतंप्रधानांना दौरा रद्द न करण्याचा आग्रह केला. मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, अरुण जेटलीजी राजकीय स्तंभ होते. परिपूर्ण ज्ञानी आणि कायद्याचे विद्वान होते. ते स्पष्ट विचाराचे नेते होते. त्यांनी भारताच्या प्रगतीत अविस्मरणीय योगदान दिले. त्यांचे जाणे खूप वेदनादायी आहे. मी त्यांच्या पत्नी संगीतजी आणि मुलगा रोहन यांना फोनवर बोलून संवेदना प्रकट केल्या आहेत. ओम शांती !, असे आपल्या पहिल्या टि्वटमध्ये त्यांनी म्हटले.

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास

त्यानतंर दुसरे टि्वट करुन मोदी म्हणाले की, ते खूप उत्साही आणि हास्यविनोद करणारे व्यक्ती होते. त्यांचे संविधान, कायदा, समाजसेवेसारख्या विषयांचे जाणकार होते.

राजकीय नेत्यांनी अरुण जेटली यांना वाहिली श्रध्दांजली