सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडसुख घेतले. हा कायदा संमत झाल्यामुळे काही राजकीय पक्ष वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत. ते लोकांना संभ्रमित करत आहेत. भावना भडकावत आहेत. मी या लोकांना सांगू इच्छितो की, मोदीला देशातील जनतेने बसवले आहे. जर तुम्हाला हे पसंत नसेल तर तुम्ही मोदीला शिव्याशाप द्या, विरोध करा, मोदीचा पुतळा जाळा. पण देशाची संपत्ती जाळू नका. गरिबांच्या रिक्षा जाळू नका, गरिबांच्या झोपड्या जाळू नका, अशी विनंती त्यांनी केली.
PM: आज जो ये लोग कागज-कागज, सर्टिफिकेट-सर्टिफिकेट के नाम पर मुस्लिमों को भ्रमित कर रहे हैं, उन्हें ये याद रखना चाहिए कि हमने गरीबों की भलाई के लिए योजनाओं के लाभार्थी चुनते समय कागजों की बंदिशें नहीं लगाईं https://t.co/IIBWsp731c
— ANI_HindiNews (@AHindinews) December 22, 2019
दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित करताना म्हटले की, देशाने निवडलेल्या खासदारांचा सन्मान करा. देशातील दोन्ही सभागृहात नागरिकत्व कायदा संमत झाला आहे. तुमच्याबरोबर मीही दोन्ही सभागृहांना प्रणाम करतो, त्यांचे अभिनंदन करतो.
CAA : शहरी नक्षली अन् काँग्रेस देशात अफवा पसरवत आहेत : PM मोदी
हे लोक आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकारणासाठी कोणत्या थराला जात आहेत हे आपण पाहत आहोत. जी वक्तव्ये करण्यात आले, खोटे व्हिडिओ, प्रक्षोभित करणारी भाषणे, उच्च स्तरावर बसलेल्या लोकांनी सोशल मीडियावर भ्रम आणि द्वेष पसरवण्याचा गुन्हा केला आहे.
आज जे लोक कागद-कागद, प्रमाणपत्र-प्रमाणपत्राच्या नावावर मुसलमानांना भ्रमित करत आहेत. त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की आम्ही गरिबांची भलाई केली, योजनांचे लाभार्थी निवडताना कधीच कागदांच्या अटी ठेवल्या नाहीत.
दिल्लीतील ४० लाख लोकांच्या जीवनात नवी सकाळः मोदी
संशोधित नागरिकता कायद्यानंतर आता बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील धार्मिक अल्पसंख्यकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
मुस्लिमांनी घाबरु नये, भाजपच त्यांचा विकास करेलः नितीन गडकरी