पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या आई हिराबेन यांनीही लावला 'PM केअर्स फंड'साठी हातभार

मोदींच्या आई हिराबेन यांच्याकडूनही मदत

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी  पीएम केअर्स फंडाच्या माध्यमातून मदत निधी जमा करण्यात येत आहे. नागरिकांनी  स्वेच्छेने आर्थिक मदत करत सरकारला हातभार लावावा, असे  आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. मोदींनी केलेल्या आवाहनानंतर खासगी कंपन्या, सार्वजनिक क्षेत्र, सामाजिक संस्था याशिवाय वैयक्तिक स्तरावर मदतीचा ओघ सुरु झाला आहे. 

लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून पीएम केअर्स फंडासाठी २५ हजार रुपयांची मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात त्यांच्या आईचे स्थान खूप महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. निवडणुकीच्या मैदानातील लढाई असो वा अन्य कोणते मोठे कार्य असो आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतात. देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेतही मोदींच्या आई त्यांच्या सोबत असल्याचे या कृतीतून पाहायला मिळते.  

COVID 19: वर्षभराचा पगार सरकारला देणार, जितेंद्र आव्हाडांचा निर्णय

कोरोनाने जगभरात कहर माजवला असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे देशाची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या घडीला कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे सोशलडिस्टन्सिंगशिवाय कोणताही पर्याय नसल्यामुळे मोदी सरकारने लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मदतीसाठी अनेकजण पुढे येत असून वेगवेगळ्या क्षेत्रातून वैयक्तिक मदत जमा होत आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi mother heeraben donates 25 thousands in PM cares fund for coronavirus victims