पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींनी घेतली त्यांच्या मातोश्रींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन

माजी गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गांधीनगर येथील आपल्या निवासस्थानी जाऊन आई हिराबेन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. एएनआयने यासंदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत. यात मोदींच्या आई त्यांना भरवताना दिसत आहेत.   

या भेटीमध्ये मोदींनी आपल्या आईसोबत बराच उशीर चर्चा केली. मागील दोन महिन्यांपासून मोदींनी आईची दुसऱ्यांदा भेट घेतली. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मोदी आईचा आशीर्वाद घ्यायला आवर्जून जातात. १७ सप्टेंबरलाच त्यांनी आईची भेट घेतली होती. मोदी 'स्टॅचू ऑफ यूनिटी' या वास्तूच्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेला यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच यानिमित्ताने आयोजित अन्य कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.