पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलाकारांनी PM मोदींसोबत केली गांधी विचारांबाबत खास चर्चा

चित्रपटसृष्टितील दिग्गजांनी घेतली मोदींची भेट

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षांच्या निमित्ताने केंद्र सरकारकडूने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चित्रपटसृष्टीतील विविध दिग्गज कलाकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ लोकार्पण मार्गावरील निवासस्थानी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

पंकजा मुंडे भोवळ येऊन व्यासपीठावर कोसळल्या

अभिनेता शाहरुख खान, आमिर खान दोन खान मंडळींसह जॅकी श्रॉफ, अभिनेत्री कंगना रनौत, जॅकलिन फर्नांडिस, निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर, बोनी कपूर, राजकुमार हिरानी, अनुराग बसू, इम्तियाज अली, आनंद एल. राय यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात सहभागी झालेल्या या मंडळींनी गांधींचा विचार लोकांपर्यंत कसा उत्तमरित्या पोहचवला जाईल याबबतच्या सूचना देखील मांडल्या.  

हा बारामतीकर तुम्हाला पुरुन उरेल!- शरद पवार

चित्रपट सृष्टितील मंडळींकडून विविध माध्यमांतून गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम होत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट सृष्टितील पाहुण्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमानंतर पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन देखील सहभागी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pm narendra modi meets bollywood stars on discusses ways to celebrate gandhis 150th birth anniversary