पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींची केदारनाथ बाबांच्या गुहेत ध्यान-धारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी सकाळी बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले. त्यांनी पूजा केल्यानंतर रुद्राभिषेक केला. केदारनाथ धाम येथील गुफेत मोदी ध्यान-धारणा करण्यास बसले. मोदी गुहेच्या दिशेने सुमारे २ किमी चालत गेले. ध्यानास बसल्यानंतर माध्यमांनी सुरुवातीचे छायाचित्र काढले. काही तासांसाठी मोदींनी ध्यान-धारणा सुरु केली असून या काळात माध्यमांना गुहेच्या परिसरात परवानगी नाही. 

प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी केदारनाथांच्या चरणी

तत्पूर्वी, विशेष हेलिकॉप्टरने आलेल्या मोदींनी खास गढवाली पोशाख परिधान केला होता. यावेळी ते काठीच्या आधाराने चालताना दिसले. हेलिपॅड ते मंदिरापर्यंत चालत जाताना त्यांनी भाविकांना हात उंचावत अभिवादन केले.