पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 8 वाजता ते देशाला संबोधित करणार आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर ते पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत. मोदी नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'जैश'कडून मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

केंद्र सरकारने मंगळवारी कलम 370 रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकला. कलम ३७० मधील काही तरतुदी रद्द करण्यात आल्या. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकाला मंजूरी दिली. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार झाले आहेत. 

पाकने व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांनाही देश 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी 27 मार्च रोजी जनतेला संबोधित केले होते. ज्यावेळी भारताने अँटी सॅटेलाईटचे परिक्षण करुन एका जिवंत सॅटेलाईटला मारले होते. त्यावेळी देशामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली होती आणि 11 एप्रिल रोजी 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते.