पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोशल युगात या गोष्टींमुळे लोकांमध्ये चिडचिड होते : PM मोदी

नरेंद्र मोदी

वर्षातील अखेरच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात होणाऱ्या हिंसक आंदोलनासंदर्भात चिंता व्यक्त केली. देशातील युवा वर्ग अराजकताच्या विरोधात असून जातीयवाद आणि घराणेशाहीबद्दल त्याच्या मनात राग आहे, असे मोदींनी म्हटले आहे. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे आहे. लोक सिस्टिम फॉलो करतात. सिस्टिम योग्य दिशेने चालत नसेल तर लोकांची चिडचिड होते, असेही मोदी या कार्यक्रमात म्हणाले. 

श्री विश्वेश तीर्थ स्वामी यांचे निधन, PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

ते पुढे म्हणाले की, आपण आता नव्या वर्षातच नव्हे तर नव्या दशकात प्रवेश करत आहोत. देशाच्या विकास अधिक गतीशील करण्याच्या दृष्टिने आपण पाऊल टाकणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या वक्तव्याचा दाखला देत मोदी म्हणाले की,  देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. बदल घडवण्याची ताकत देशातील युवांकडे आहे. स्वामी विवेकानंद हे सर्व वयातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. सूर्य ग्रहणविषयी देखील मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले की. देशातील युवांप्रमाणे मी देखील सूर्य ग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण दिल्लीतील वातावरणामुळे ते शक्य झाले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

उत्तर भारतात धडकी भरवणारी थंडी! दिल्लीसह सहा राज्यांत 'रेड अलर्ट'

यावेळी मोदींनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिल्याचे पाहायला मिळाले.  स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनामित्त २०२२ मध्ये आपण नवा संकल्प करुयात.   आगामी दोन-तीन वर्षात मी केवळ स्थानिक उत्पादनं खरेदीसाठीच आग्रही राहिन. देशवासियांनी देखील हा संकल्प करुन स्वदेशीचा अभिमान बाळगायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.