पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mann Ki Baat: प्लास्टिकमुक्त भारत अभियानाची मोदींकडून घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. दुसऱ्या कार्यकाळात तिसऱ्यांदा ते या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी दोन 'मोहन' बाबत सांगितले. एक चक्रधारी आणि दुसरे चरखाधारी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी. दि. ११ सप्टेंबरपासून 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाची सुरुवात होणार असून त्याचबरोबर २९ ऑगस्टपासून राष्ट्रीय क्रीडा दिनी फिट इंडिया मुव्हमेंट लाँच करणार असल्याचे जाहीर केले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्याकाही वर्षांपासून आपण २ ऑक्टोबरपूर्वी सुमारे २ आठवड्यापर्यंत देशभरात 'स्वच्छता ही सेवा अभियान' चालवतो. यावेळी ते ११ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या दरम्यान प्रत्येकाने आपापल्या घरातून बाहेर येऊन श्रमदानाच्या माध्यमातून महात्मा गांधींना कार्यांजली द्यावी. घर असो वा गल्ली, चौक किंवा नाले, शाळा, महाविद्यालये आदी सार्वजनिक स्थळांवर स्वच्छतेचे महाअभियान राबवायचे आहे. यावेळी प्लास्टिकवर विशेष जोर द्यायचा आहे. प्लास्टिक पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत पिशवी आणावी, असे अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी दुकानांबाहेर लिहिले आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. प्रत्येक नागरिकाने यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले. 

५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्था शक्यः प्रणव मुखर्जी

यावेळी २ ऑक्टोबरला जेव्हा महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जाईल. त्यावेळी त्यांना केवळ उघड्यावर शौचापासून मुक्त भारत समर्पित करणार नसून त्या दिवशी संपूर्ण देशात प्लास्टिकविरोधात एक नव्या जन आंदोलनाचा पाया रचला जाईल, असेही ते म्हणाले.

माझा मित्र अरुण मला सोडून गेल्याची वेदना असह्य : मोदी