पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

९ वाजून, ९ मिनिट; पंतप्रधान मोदींनीही प्रज्वलित केले दिवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी दीप प्रज्वलन केले.

कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी भारतीयांनी रविवारी रात्री ९ वाजता वीज बंद करुन दिवे, मेणबत्ती, मोबाइल फ्लॅश लाइट लावून एकजूट दाखवली. देशवासियांना हे करण्यासाठी आवाहन करणारे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या निवासस्थानी वीज बंद करुन दीप प्रज्वलित केलेले छायाचित्रे टि्वट केले. गुजरातमध्ये त्यांच्या मातोश्री हिराबेन यांनीही दिप प्रज्वलित केले. 

कोरोना विषाणूविरोधात अख्खा देश एकवटला, पाहा PHOTOS

पंतप्रधान मोदी यांनी दिप प्रज्वलित करतानाचे छायाचित्रे टि्वट करताना त्याच्याबरोबर एक श्लोकही शेअर केला आहे. 'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥'

या श्लोकाचा अर्थ- जो शुभ करतो, कल्याण करतो, आरोग्य राखतो, धन-संपदा देतो आणि शत्रू बुद्धीचा विनाश करतो, अशा दिव्याच्या प्रकाशाला मी नमन करतो. 

पंतप्रधान मोदींचे आवाहन, देशवासियांचा पाठिंबा