पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२० वर्षांपूर्वी युद्धप्रसंगीच कारगिलला भेट दिली होती: PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

ज्या वीर जवानांनी कारगिलच्या उंच पर्वतावरुन तिरंगा उतरवण्याचे मनसूबे उधळून लावले त्या वीर जवानांना सलाम करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. युद्ध सरकार नव्हे तर संपूर्ण देश लढतो, असेही ते म्हणाले.  कारगिल विजय दिवसाच्या समारोपाप्रसंगी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  

पुन्हा  हिंमत करु नका, नाहीतर..,लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

मोदी म्हणाले की, कारगिलचा विजय हा भारताच्या वीर जवानांच्या साहसाचे प्रतिक आहे. कारगिल युद्धातील विजय हा भारताचा सामर्थ्य आणि संयमाचा विजय होता. कारगिलचा विजय हा संकल्पाचा विजय होता. देशासाठी रक्त सांडणाऱ्या जवानांसोबतच वीर जवानांच्या जन्मदात्या आईलाही मी शतश: नमन करतो, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

Vijay Diwas : कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात कार्यक्रम

ते पुढे म्हणाले, २०१४ मध्ये  पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर काही महिन्यातच कारगिलला जाण्याचा योग आला. ही कारगिलला जाण्याची पहिली वेळ नव्हती असेह ते म्हणाले. याअगोदर २० वर्षांपूर्वी युद्ध अखेरच्या क्षणात होते त्यावेळी देखील मी कारगिलला भेट दिली होती. शत्रू उंच पर्वतावर बसून आपल्याविरुद्ध कट रचत असताना मृत्यूची पर्वा न करत आपला जवान पुढे पावलं टाकत होता. त्यांच्या शौर्याला मी त्या भूमीत जावून नमन केले, असेही मोदींनी सांगितले.