पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प म्हणाले, मोदी हे 'फादर ऑफ इंडिया'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील मैत्रीचे नवे रुप पाहायला मिळत आहे. याचदरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना 'फादर ऑफ नेशन' असे म्हटले आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी मोदींची तुलना अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्ली यांच्याशी केली आहे. दि्वपक्षीय चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. यापूर्वी ह्यूस्टन येथील 'हाऊडी मोदी' कार्यक्रमावेळीही ट्रम्प यांनी मोदींची तोडभरुन स्तुती केली होती. 

ट्रम्प माध्यमांना म्हणाले की, मला तो भारत आहे माहीत आहे, जो खूप विभागला गेला होता. तिथे खूप मतभेद होते, वाद होते. पण ते (पंतप्रधान मोदी) सर्वांना बरोबर घेऊन आले. ज्याप्रमाणे एक पिता सर्वांना एकत्र आणतो. कदाचित ते भारताचे पिता आहेत. आपण त्यांना फादर ऑफ इंडिया म्हणू शकतो.

त्यावेळी ट्रम्प यांना ह्यूस्टन कार्यक्रमासंबंधी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, माझ्या उजव्या बाजूला बसलेले लोक त्यांनी पसंत करतात. लोक वेडे होऊन जातात. ते एल्विस प्रिस्लेचे भारतीय रुप आहेत. एल्विस प्रेस्ली हे अमेरिकन गायक आणि अभिनेते होते. त्यांना 'किंग ऑफ रॉक अँड रोल' म्हटले जात.