पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Discovery वरील प्रसिद्ध 'मॅन वर्सेस वाईल्ड'मध्ये लवकरच नरेंद्र मोदी

कार्यक्रमातील एका क्षणी नरेंद्र मोदी

डिस्कव्हरी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'मॅन वर्सेस वाइल्ड'मध्ये लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. हा कार्यक्रम १२ ऑगस्टला या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स यांनी या संदर्भात त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केले आहे. त्यातच नरेंद्र मोदी बेअर ग्रिल्ससोबत या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळते.

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमवर चर्चा ?

व्हिडिओ ट्विट करताना बेअर ग्रिल्स याने म्हटले आहे की, सुमारे १८० देशांतील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती बाजू बघायला मिळेल, जी आतापर्यंत त्यांना माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मॅन वर्सेस वाईल्ड बघा १२ ऑगस्टला रात्री नऊ वाजता. 

बेअर ग्रिल्स याने त्याच्या ट्विटर हँडलवरून जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी एका जीपमधून येताना दिसतात. ते ग्रिल्ससोबत बोलतानाही दिसतात. ते दोघेही एका होडीत बसल्याचे बघायला मिळते. व्हिडिओमध्ये दोघेही हसताना बघायला मिळतात.

या आधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.