पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... अखेर इस्रो प्रमुख के सीवन यांना अश्रू अनावर

के सीवन यांना धीर देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले.

महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहिमेत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यामुळे इस्रोच्या बंगळुरूमधील कार्यालयात कालपासून गंभीर स्वरुपाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गळाभेट घेत असताना इस्रोचे प्रमुख के सीवन यांना अश्रू अनावर झाले. मोदींनी सीवन यांना जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले.

शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि प्रवास दोन्ही अभिनंदनीय - नरेंद्र मोदी

चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. पण त्याचा संपर्क तुटल्यामुळे चंद्रावर उतरणे शक्य झालेले नाही. अशातच नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी इस्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. यानंतर इस्रोच्या केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांनी इस्रोचे प्रमुख के सीवन यांची गळाभेट घेतली. यावेळी सीवन यांना अश्रू अनावर झाले. मोदींनी त्यांना जवळ घेत त्यांचे सांत्वन केले.

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यापासूनच सीवन यांच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचे जाणवत आहे. भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिम होती. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या कामगिरीकडे लागले होते.