पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विद्यार्थी आंदोलनामागे काँग्रेससह शहरी नक्षलवाद्यांचा हात'

नरेंद्र मोदी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिल्लीसह देशातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलन सुरु आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील तरूणांना बिघडवण्याचा खेळ काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी थांबवावा. तसेच, विद्यार्थी आंदोलनामध्ये कुठेतरी काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांकडून कट रचला जात असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. झारखंड येथील बरहेटमध्ये मोदींची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली.  

...म्हणून बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणेंनी साधला PM मोदींवर निशाणा

तसंच, 'हिंमत असेल तर पाकिस्तानातील प्रत्येक नागिरकाला भारताचं नागरिकत्व देण्याची घोषणा करावी असे आव्हान मी काँग्रेसह इतर विरोधी पक्षांना देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल, असे मोदींनी सांगितले. तसंच, काँग्रेस आणि विरोधी पक्षाने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करुन दाखवावा, तिहेरी तलाक विरोधी कायदा रद्द करावा, असे देखील आव्हान  मोदींनी काँग्रेसला केले आहे. 

CAB : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, 'तुम्ही तुमच्या महत्वाला समजून घ्या, ज्या संस्थेमध्ये शिकत आहात त्या संस्थेचे महत्व समजून घ्या. सरकारच्या निर्णय आणि धोरणांवर चर्चा आणि डिबेट करा. जर तुम्हाला काही चूकीचे वाटत असेल तर लोकशाही पध्दतीने विरोध करा, आपला मुद्दा सरकारला सांगा. हे सरकार तुमचे म्हणणे आणि तुमच्या भावनांना समजते, असे मोदींनी सांगितले. 

'जामिया'मध्ये जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच