पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BJP नेत्याकडून मोदींची छत्रपती शिवरायांंशी तुलना, आव्हाड संतापले

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या शिर्षकाखाली भाजप नेते भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, अशा आशयाच्या पुस्तकाचे रविवारी दिल्ली येथील भाजप कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे भाजप आणि मोदींवर टीका करण्यात येत आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या शिर्षकाखाली भाजप नेते भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भात माहिती दिली आहे. 

भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या वल्गना करु नका, फडणवीसांचे प्रत्युत्तर\

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनतर भाजपचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सोशल मिडियावरून या पुस्तकाच्या विरोधात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

'कटमनी' मिळत नसल्यानेच ममतांचा केंद्राच्या योजनांना नकारः मोदी

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दांत यावर संताप व्यक्त केलाय. जगाच्या अंतापर्यंत दुसरे  छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी', पटत नाही मनाला, असे ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी पुस्तकावर आपला आक्षेप नोंदवला आहे.

जिजाऊंच्या पोटी सूर्य जन्मला! शिवाजी महाराजांच्या काजळीचीही झालर कुणाला येणार नाही. मोदींनी आपण काय आहोत ते स्वत: आरशात पाहावं, अशा शब्दांत आव्हाडांनी मोदींवरही तोफ डागली आहे. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी देखील या पुस्तकावर आक्षेप नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. काल, आज आणि उद्या कोणाचीही छत्रपती महारांजाची तुलना होऊ शकत नाही, सरकारने हे पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणी देखील सातव यांनी केली.