पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी

नरेंद्र मोदींनी घेतली जवानांची भेट

देशभरामध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाची दिवाळी लष्करी जवानांसोबत साजरी केली आहे. जम्मू-काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली. कलम ३७० रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी जम्मू-काश्मीर येथे आले आहेत. याठिकाणी त्यांनी जवानांना फराळ वाटप करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

PM मोदींची अयोध्यासंदर्भात पहिल्यांदाच 'मन की बात' 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या ५ वर्षांपासून जवानांसोबत दिवाळी साजरी करत आले आहेत. जवानांनाच ते आपले कुटुंब मानत असल्याचे मोदींनी यापूर्वी सांगितले आहे. २०१८ मध्ये मोदींनी उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवर लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१४ मध्ये त्यांनी सियाचिन येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 

सोनं विक्रीच्या वृत्तावर आरबीआयचे स्पष्टीकरण

२०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाब सीमेवर दौरा केला होता. त्याठिकाणी अग्रिम चौकीजवळ तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. तर २०१७ साली जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टर येथे त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.