पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताकडे लकवरच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' असणार - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन संपूर्ण देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडून उचलण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख केला. तसंच त्यांनी सुरक्षा क्षेत्रासंबंधी एक मोठी घोषणा देखील केली. देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी या तिन्ही दलांवर एक प्रमुख नेमण्यात येणार असल्याची घोषणा मोदींनी केली.

जे ७० वर्षात झाले नाही ते ७० दिवसात केले - मोदी 

यावेळी मोदी असे म्हणाले की, 'आपले जवान हा आपला अभिमान आहे. तिन्ही सुरक्षा दलामध्ये परस्पर समन्वय वाढवण्यासाठी तसंच त्यांना आणखी मजबूत करण्यासाठी सरकार महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. भारतामध्ये लकवरच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' हे पद निर्माण केले जाणार आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही सैन्य दलाचा प्रभारी म्हणून काम करेल. 'चीफ ऑफ डिफेन्स' तिन्ही सुरक्षा दलाला आणखी प्रभावी बनवेल.' असे मोदींनी सांगितले. 

Independence Day: देशभरामध्ये ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह

गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सुरक्षाविषयक अनेक समित्यांनी 'चीफ ऑफ डिफेन्स'सारखे एखादे पद असावे अशी मागणी केली होती. यावर आता सरकारने योग्य ते पाऊल उचलले असून आज याबाबत मोदींनी घोषणा केली आहे. 'चीफ ऑफ डिफेन्स'मुळे आता देशातील तिन्ही सुरक्षा दलामध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. 

आम्ही युद्धासाठी सज्ज, पाक पंतप्रधानांची भारताला धमकी