पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादाला मदत, अर्थसहाय्य करणाऱ्या देशांना जबाबदार धरा - मोदी

नरेंद्र मोदी

दहशतवादाला मदत आणि अर्थसहाय्य करणाऱ्या देशांना त्यासाठी जबाबदार धरले जावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या SCO व्यासपीठावरून मांडली. बिश्केकमध्ये सुरू असलेल्या या परिषदेला विविध देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. 

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेतील देशांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. दहशतवाद ही संपूर्ण जगासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे त्याचा बिमोड करणे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सर्व कार्यक्रमात भारताने सक्रीय योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघटनेची भूमिका आणि विश्वासार्हता वाढावी यासाठी भारताने प्रयत्न केले असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. भारत शांघाय सहकार्य संघटनेचा दोन वर्षांसाठी कायम सदस्य झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी परिषदेमध्ये बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्याशी चर्चा केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi at SCO summit said Countries supporting terrorism must be held accountable