पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SCO परिषदेत मोदी-इमरान यांच्यात चर्चा होणं 'मुश्किल'

इमरान खान आणि नरेंद्र मोदी

किरगिझस्तानची राजधानी असलेल्या बिश्केक येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही प्रमुख राष्ट्रांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. मात्र, पहिल्या दिवशी मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट झालेली नाही, असे वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमरान यांना भेट घेणे टाळले असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.

या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तान हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी मिळाली होती. पण त्यांनी  ओमान, इराण आणि मध्य आशिया अशा लांब पल्ल्याच्या मार्ग निवडला होता. दरम्यान या परिषदेमध्ये पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाही, अशी भारताची भूमिका असून शेवटच्या दिवशीही इमरान खान आणि नरेंद्र मोदी यांच्यात काही चर्चा होणे अशक्य आहे.  

दरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी मोदींनी चीनचे राष्ट्रपतींची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये भारत-चीन संबंध सुधारणेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. याशिवाय मोदींनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेठीमधील रायफल युनिटसंदर्भात पुतीन यांचे आभार मानले.