पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गोडसे देशभक्त की मारेकरी?, मोदी-शहांनी भूमिका स्पष्ट करावी'

दिग्विजय सिंह

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजप नथुराम गोडसेला देशभक्त मानतात की महात्मा गांधींचा मारेकरी हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. ग्वाल्हेर येथे माध्यमांशी ते बोलत होते. 

ते म्हणाले, भाजपचे नेते महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संकल्प यात्रा काढत आहेत. पण त्यांनी हे सांगावे की नथुराम हा देशभक्त होता किंवा नाही. भाजपची विचारधारा ही गांधींच्या अगदी विरुद्ध आहे. 

दिल्लीला हादरवण्यासाठी जैशने 'या' संघटनांशी केली हात मिळवणी

एक प्रश्नाचे उत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, १९७०-७१ मध्ये संघाचे कुशाभाऊ ठाकरे आणि राजमाता विजयाराजे शिंदे यांनी मला जनसंघात सहभागी होण्यास सांगितले होते. पण मी गेलो नाही. कारण मी गांधींना मानतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नथुराम गोडसेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी २०१९ मध्ये भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह उभ्या होत्या. दोघांमध्ये रोमांचक लढत झाली होतीय प्रज्ञा ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. नथुराम गोडसे हे सच्चे देशभक्त होते आणि कायम राहतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

दोषींना परत पाठवण्याचे यमराजाला आदेश द्या, हायकोर्टात अजब मागणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi and amit shah should clear parties stand on nathuram godse demand by digvijay singh