पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नमस्ते ट्रम्प': भारत-अमेरिकेच्या नात्याचे नवे युग सुरु- PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नमस्ते ट्रम्प, नमस्ते ट्रम्प, नमस्ते ट्रम्प असा त्रिवार उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटेरा स्टेडिअमवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जोरदार स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मोठा विचार करतात. त्यामुळेच ते अमेरिकेचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहेत. ट्रम्प प्रशासनात भारत आणि अमेरिकेच्या नव्या नात्याचे युग सुरु झाले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या लाखो लोकांकडून इंडिया-यूएस फ्रेंडशिपबरोबर 'लाँग लिव'ची घोषणा वदवून घेतली. 

आज मोटेरा स्टेडिअममध्ये एक नवा इतिहास रचला जात आहे. पाच महिन्यांपूर्वी मी आपल्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात ह्यूस्टनमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाने केली होती. आज माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ऐतिहासिक भारत दौऱ्याची सुरुवात अहमदाबादमधील 'नमस्ते ट्रम्प'ने करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

- दीर्घ प्रवासानंतर ट्रम्प हे थेट साबरमती आश्रमात आले आणि पुन्हा येथे मोटेरा स्टेडिअमवर. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. भारत-अमेरिकेतील नव्या नात्याच्या युगास सुरुवात झाली आहे. 

- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आपल्या विविधतेने पूर्ण असलेल्या भारतात आले आहेत. जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात. शेकडो प्रकारचे वस्त्रे आहेत, शेकडो प्रकारच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती आहेत. अनेक पंथ आणि समुदाय आहेत. विविधेत एकता भारत आणि अमेरिकेदरम्यान मजबूत नात्याचा मोठा आधार आहे. 

- एक लँड ऑफ दी फ्री आहे. तर दुसरे संपूर्ण जगाला एक परिवार मानतात. एकाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर गर्व आहे. तर दुसऱ्याला जगातील सर्वांत उंच सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा अभिमान आहे. 

- ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेची मैत्री आणखी दृढ झाली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा दौरा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा नवा अध्याय आहे. एक असा अध्याय जो अमेरिका आणि भारतासाठी प्रगती आणि समृद्धीचा नवा दस्तावेज बनेल.

- इवांका या दोन वर्षांपूर्वी भारतात आल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, त्यांना पुन्हा भारतात यायचे आहे. तुम्ही पुन्हा आल्या आहात. ही आनंदाची गोष्ट आहे.