पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींनी दिला सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अखेरच्या श्वासांपर्यंत सुषमाजींनी आनंदी आणि उत्साहाने जीवन जगल्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मंगळवारी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. मोदींसह अनेक राजकीय नेत्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.  

सुषमा स्वराज यांनी दिलेली ती शिकवण आजही स्मरणात

यावेळी मोदी म्हणाले की, सुषमा स्वराज यांच्या व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी बहरलेले होते. त्या विचारांच्या पक्क्या होत्या. आपला कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी सरकारी निवासस्थान तातडीने सोडल्याची आठवणही मोदींनी सांगितली. कार्यकाळ संपल्यानंतरही अनेक खासदार सरकारी निवासस्थान सोडत नाहीत, असा उल्लेखही त्यांनी केला. त्यांचे वक्तृत्व प्रभावी आणि प्रेरणादायी असायचे. त्यांच्या भाषणातून विचार आणि अनुभवाचा सुरेख मिलाफ अनुभवायला मिळायचा. या दोन्ही गोष्टी एखाद्याकडे मोठ्या साधनेशिवाय शक्य नसते.  

सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर अडवाणींच्या डोळ्यात पाणी

मोदी सरकारच्या पहिल्या सरकारमध्ये सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या. त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री होत्या. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही सुषमा स्वराज मंत्री राहिल्या होत्या.  ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे एम्स रुग्णालयात निधन झाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pm narendra modi addresses condolence meet for late former union minister sushma swaraj being held at jawaharlal nehru stadium