पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लालकिल्ल्यावरील मोदींच्या भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे

नरेंद्र मोदी

आज देशभरामध्ये ७३ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरुन संपूर्ण देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडून आतापर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांचा उल्लेख केला. तिहेरी तलाक विरोधी कायदा, कलम ३७० सह अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी यावेळी असे सांगितले की, देशामध्ये ७० वर्षात जे झाले नाही ते त्यांनी फक्त ७० दिवसांमध्ये करुन दाखवले. तसंच आम्ही अडचणी टाळत नाही किंवा कुरवाळत बसत नाही, असे मोदींनींनी सांगितले. 

दरम्यान, मोदींच्या लालकिल्ल्यावरील भाषणातील १५ महत्वाचे मुद्दे - 

१. अनेक वर्षांपासून मुस्लिम महिलांना अधिकार दिले गेले नाही. तिहेरी तलाकबदद्ल मुस्लिम महिलांच्या मनात भीती होती. तिहेरी तलाक विरोधी विधेयक रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार मिळाला. तिहेरी तलाक राजकीय निर्णय नाही तर समानतेसाठी सरकारने घेतलेला निर्णय आहे. 

२. जे ७० वर्षामध्ये झाले नाही ते आम्ही ७० दिवसात करुन दाखवले. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पुनर्रचनेच्या दिशेने वाटचाल केली. मागच्या सरकारने त्यावर फक्त प्रयत्न केले. मात्र आम्ही ते करुन दाखवले. 

३. जम्मू-काश्मीर, लडाख येथील नागरिकांची इच्छा पूर्ण व्हावी ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ हटणं हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. फक्त १० दिवसात सरकारने देशहिताची पावलं उचलली.

४. जम्मू-काश्मीरमध्ये भ्रष्टाचार होत होता, लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत होते. गेल्या ७० वर्षात फूटीरतावाद आणि दहशतवादाला बळ मिळाले. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कलम ३७० रद्द केले. त्यामुळे आदिवासी आणि दलितांना काश्मीरमध्ये राजकीय अधिकार मिळाले.

५. आज देश अभिमानाने सांगू शकतो की, 'एक देश, एक संविधान'. तसंच जीएसटीमुळे वन नेशन, वन टॅक्स करण्यात यश आले.

६. आपल्या संविधानाची निर्मिती करणाऱ्यांनी, देश, देशाच्या महापुरुषांनी कठिण परिस्थितीमध्ये देशासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 

७. देशातून गरिबी हद्दपार करण्याची वेळ आली आहे. गरिबी हटवण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. 

८. राजकारण नाही तर देशाचे भविष्य महत्वाचे आहे. एक देश, एक संविधान आज प्रत्यक्षात आले आहे. देशाला जोडण्याचे काम आज सरकारने केले  आहे. 

९. २०१४ ते २०१९ हा गरजांचा पूर्तता करण्याचा काळ होता. तर २०१९ नंतरचा काळ हा देशवासियांच्या आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्याचा काळ आहे.

१०. प्रत्येक घरामध्ये पिण्याचे शुध्द पाणी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पाणी वाचवण्यासाठी सरकार अभियान चालवणार आहे. जल जीवन मिशन घेऊन सरकार पाण्यासाठी काम करणार आहे. जलजीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटी रुपये वापरणार आहोत.  

१०. 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन आम्ही चाललो होतो. मात्र ५ वर्षातच देशवासियांनी 'सबका विश्वास'च्या रंगाने संपूर्ण वातावरण रंगवलं आहे. 

११. वाढती लोकसंख्या देशासमोरील मोठे आव्हान आहे. छोटं कुटुंब म्हणजे देशभक्तीचे कार्य असते. छोट्या कुटुंबामुळे विकासाला गती मिळाली. 

१२. गेल्या ५ वर्षात प्रत्येक दिवसाला एक-एक कायदा रद्द केला. जे कायदे कालबाह्य झाले त्यांना हद्दपार केले.

१३. गेल्या ७० वर्षापासून देशात भ्रष्टाचार सुरु आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन देशातील भ्रष्टाचार कमी करण्यात येणार आहे. 

१४. देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ९० हजार कोटी रुपये दिले जात आहे. तसच मजूर आणि शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना सुरु करण्यासाठी देखील पावलं उचलली जात आहे. 

१५. ७० वर्षामध्ये फक्त २ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था केली गेली. तर ५ वर्षात आम्ही ३ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था केली.

भारताकडे लकवरच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' असणार - मोदी