पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढ्यासाठी संकल्प आणि संयम दृढ करण्याची गरज : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानं जगातील जेवढे देश प्रभावित झाले  त्यापेक्षाही अधिक प्रभाव कोरोना विषाणूचा दिसतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या देशातील वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी विनाकरण गर्दी टाळण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. जगाला प्रभावित करणाऱ्या या परिस्थितीकडे कानाडोला करुन चालणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.  

 मोदी 'लॉक डाउन'ची घोषणा करणार ही फक्त अफवा

संकल्प आणि संयम याच्या माध्यमातून जागतिक संकटाचा सामना करायचा आहे. तुम्ही निरोगी राहाल तर जग निरोगी असेल, असे सांगत मोदींनी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. आगामी काही आठवडे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. काही होणार नाही असा भ्रम बाळगून विनाकारण बाहेर फिरु नका, असा सल्ला देताना मोदींना ६० ते ६५ वर्षांच्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये, असे आवर्जून सांगितले. 

कोरोनाशी लढा : PM मोदींकडून 'जनता कर्फ्यू'चं आवाहन

भारतासारख्या १३० कोटींच्या विकसनशील देशावर करोनाचं संकट येणं ही सामान्य गोष्ट नाही. याचा देशाच्या अर्थव्यस्थेवरही परिणाम होणार आहे. यासाठी अर्थमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली 'कोविड १९ टास्क फोर्स' नेमणार असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. सद्यपरिस्थीतीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा थांबणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंची खरेदी अगोदर प्रमाणे सामान्य करावी. वस्तूंचा साठा करण्याची खटाटोप करु नये, असेही मोदींनी सांगितले. संपूर्ण जग या संकटाचा सामना करत आहे. प्रत्येक भारतीयाने सजग राहायला हवे, असेही मोदींनी म्हटले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडणं टाळा. ऑफिसची कामं घरातूनच करण्याचा प्रयत्न करा, असे सांगताना मोदींनी व्यापार वर्गाला या काळात कामावर येऊ न शकणाऱ्याचे वेतन कपात करु नका, असेही मोदींनी सांगितले आहे.