पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतोः PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. शेजारील देश जाणतो की, ते भारताकडून तीन-तीन युद्धात पराभूत झाले आहेत. भारतीय लष्कराने मनात आणले तर १० दिवसांत त्यांना पराभवाची धूळ चारु शकते, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला ठणकावले. दिल्लीत एनसीसी कॅडेट्सला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, बसपासमवेत विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. पूर्वीच्या सरकारांनी अनेक दशके सुधारित नागरिकत्व कायदा विधेयक, शत्रू संपत्ती विधेयक लटकवून 'व्होट बँके'चे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईत फटका गँगला रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा उपाय

आपल्याला माहीत आहे की आपला शेजारी देश आपल्याकडून ३-३ वेळा युद्ध हारला आहे. त्यांना धूळ चारायला आपल्या सैन्याला १० ते १२ दिवसांचा वेळ लागेल. गेल्या काही दशकांपासून ते आपल्या विरोधात प्रॉक्सी वॉर करत आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा जीव जात आहे. आपले जवान शहीद होत आहेत. 

सत्ता येताच सरकारी जमिनीवरील मशिदी हटवूः भाजप खासदार

सीएए-एनआरसीवर ते म्हणाले की, अफवा परवणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की मोदीने फक्त प्रतिष्ठेसाठी जन्म घेतलेला नाही. मोदीसाठी देशाची प्रतिष्ठा सर्वकाही आहे. दशकांपासून प्रलंबित असलेली समस्या आमचे सरकार सोडवत असताना लोक धार्मिकतेचा रंग लावत आहेत. त्यांचा खरा चेहराही देशाने पाहिला आहे. देश पाहत आहे, देशाला समजत आहे. गप्प आहे, पण त्यांना सर्व कळत आहे.