पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ताधाऱ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते हे लक्षात ठेवा : PM मोदी

नरेंद्र मोदी

ज्या आशा आकांक्षा घेऊन आपल्या पक्षाचा उदय झाला तो उद्देश साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  

पंतप्रधान मोदींचे विद्यार्थ्यांना पाच मोलाचे कानमंत्र

मोदी म्हणाले की, आपण देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे. हेच काम आपल्याला शेवटपर्यंत करायचे आहे. सार्वजनिक निर्णय घेत असताना प्रत्येकाला काहीना काही अडचणी येतात. पण पक्षाची ध्येय धोरणांचा विसर पडता कामा नये. माझ्या आयुष्यातील सर्वाधिक उर्जादायी काळ मी हिमाचलमधील लोकांमध्ये व्यतित केलाय. त्यामुळे मला विश्वास आहे की जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मुलभूत आदर्श आणि विचार घेऊन एक विशिष्ट उंची गाठेल.  

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

संघर्ष आणि संघटन या दोन गोष्टीवर आपला पक्ष उभा आहे. देशहितासाठी संघर्ष करायला हवा. संघटना मजबूत करण्यावर भर द्यायला पाहिजे. सत्तेमध्ये असताना पक्षाचे नेतृत्व करणे हे मोठे आव्हानात्मक कार्य असते, असेही मोदी यावेळी म्हणाले. जेव्हा आपण विरोधी बाकावर होतो त्यापेक्षाही अधिक आव्हानांना आपल्याला सामोरे जायचे आहे, असा कानमंत्रही मोदींनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.  भाजपमध्ये एका व्यक्तीकडे एकच पद असते. तरीही २०१९ मधील लोकसभा निवडणूक झाल्यावर अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ही दोन्ही पदे होती. त्यावेळी नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून पुढील अध्यक्ष कोण होणार याची चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर जे पी नड्डा यांच्या निवडीमुळे त्याला पूर्णविराम मिळाला आहे.